घरपट्टीचा बोजा टाकल्यामुळे चिपळूण पालिकेविरोधात आंदोलन करणार.
नगर परिषदेने नागरिकांवर घरपट्टीचा बोजा टाकल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला होता. गुरूवारी एकता व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व नागरिक यांनी नगर पालिकेवर धडक दिली. मुख्याधिकारी विशाल भोसले व प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर यांच्यासोबत चर्चेत शिरीष काटकर, अरूण भोजने, संदीप लवेकर, मनोज शिंदे आदींनी जाब विचारला. सर्व्हेच्या अनेक चुका प्रशासनाच्या निदर्शनास आणण्यात आल्या. झालेल्या चुका मान्य करून त्या सुधारण्यात येतील असे मान्य करण्यात आले. www.konkantoday.com