गोव्यानंतर आता कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्याच्या प्रस्तावाला कर्नाटक राज्य सरकारची पूर्णपणे संमती.
गोव्यानंतर आता कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्याच्या प्रस्तावाला कर्नाटक राज्य सरकारने पूर्णपणे संमती दर्शवली आहे.बेळगावमधील हिवाळी अधिवेशनात बोलताना मोठ्या आणि लघु उद्योग तसेच पायाभूत सुविधा विकास मंत्र्यांच्या वतीने बोलताना ऊर्जा मंत्री के. जे जॉर्ज यांनी सदर माहिती दिली.”यापूर्वीच कोकण रेल्वे भारतीय रेल्वेमध्ये विलीन व्हायला पाहिजे होती.
मात्र काही ऑपरेशनला अडचणींमुळे प्रदेशातील काही रेल्वे स्थानकांचा हवा तसा विकास झाला नाही.सध्या कर्नाटकच्या २७० कोटी रुपयांच्या इक्विटी योगदान समायोजनेबाबत पत्रव्यवहार सुरु आहेत आणि कोकण रेल्वेच्या विलीनीकरानंतर लवकरच रेल्वे स्थानकांमध्ये सुधारणा दिसून येतील तसेच नवीन गाड्या देखील सुरु केल्या जातील” अशी माहिती ऊर्जा मंत्री के. जे जॉर्ज यांनी दिली.
कोकण रेल्वेची भागेदारी एकूण चार राज्यांमध्ये विभागलेली असून आत्तापर्यंत दोन राज्यांनी रेल्वेच्या विलीनीकरणाला संमती दर्शवली आहे, यामध्ये आधी गोवा आणि आता कर्नाटक यांचा समावेश होतो. कर्नाटक राज्य सरकारने यापूर्वीच कोकण रेल्वेला पत्र लिहून विलीनीकरणाला संमती दिली असल्याची माहिती ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री प्रियांक खर्गे यांनी दिली.