उदय सामंत यांनी महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्रीपदाची घेतली शपथ
नागपूर, १५ डिसेंबर:शिवसेना उपनेते आणि रत्नागिरी-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार उदय सामंत यांनी आज महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने सामंत यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवत ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.यासंदर्भात मंत्री उदय सामंत यांनी ट्विट केलं ते म्हणाले की “महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन आज नव्या सदस्यांनी राजभवन, नागपूर येथे मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये, राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदाची मी शपथ घेतली. महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून मला दिलेली जबाबदारी मी अत्यंत नम्रपणे स्वीकारत असून लोकसेवेसाठी सदैव कटिबद्ध असल्याच सामंत यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ट्विट केलं आहे.