
रत्नागिरी तालुक्यातील खालगांव येथील प्रौढाचा सर्पदंशाने मृत्यू.
रत्नागिरी तालुक्यातील खालगांव येथील प्रौढाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. गणपत गोविंद पाल्ये (५९, रा. शिंदेवाडी, खालगांव) असे मृताचे नाव आहे. ५ डिसेंबर रोजी गणपत यांना सर्पदंश झाला होता. उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, अशी नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आहे. गणपत पाल्ये हे ५ डिसेंबर रोजी उंबर खरी येथे शेतामध्ये काम करत होते.
सायंकाळी ४ च्या सुमारास विषारी सापाने त्यांना देश केला. त्यांना उपचारासाठी प्रथम जिल्हा शासकीय रूग्णालय येथे दाखल करण्यात आले. यावेळी त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे पाठवण्यात आले. कोल्हापूर येथे उपचारादरम्यान गणपत यांचा मृत्यू झाला, अशी नोंद करण्यात आली आहे.www.konkantoday.com