चेंबूरच्या अमर महल विभागात असलेल्या दोन दुकानांना भीषण आग.
चेंबूरच्या अमर महल विभागात असलेल्या दोन दुकानांना भीषण आग लागली आहे. फर्निचर दुकानासह सायकलच्या दुकानाला आग लागल्याचे समोर आले आहे. घटनास्थळावर अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या . आग विझवण्यास अग्निशमन दलाच्या जवानाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. दुकानाला आग लागल्यामुळे आजूबाजूचा परिसर रिकामा करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.अमर महल विभागात लागलेल्या आगीमुळे परिसरात घबराट पसरली होती. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन अधिक गाड्या रवाना करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पोलीस प्रशासनही घटनास्थळी पोहोचले होते. प्रशासनाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.