आमदार भास्कर जाधव यांना असंविधानिक शिवीगाळ करणार्या मोर्चेकर्यांवर कारवाई करा.
गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्याविरोधात शुक्रवारी वंचित बहुजन विकास आघाडीने शुक्रवारी येथे काढलेल्या मोर्चात आमदार जाधवांना असंविधानिक शिवीगाळ करत मानहानी केल्याबद्दल शनिवारी महाविकास आघाडीही आक्रमक झाली.
शनिवारी शिवसेना उबाठासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकार्यांनी प्रांताधिकारी आकाश लिंगाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांना निवेदन देत मोर्चा काढणार्यांवर कारवाई न झाल्यास आम्हीही रस्त्यावर उतरू, असा इशारा दिला आहे. www.konkantoday.com