आंगणेवाडीच्या भराडी देवीने कौल दिला, 22 फेब्रुवारी 2025 रोजी जत्रा होणार.
कोकणातील लोकांसाठी महत्त्वाची जत्रा म्हणजे आंगणेवाडीच्या भराडीदेवीची जत्रा . दरवर्षी देवीला कौल लावून या जत्रेची तारीख ठरवली जाते. त्यामुळे आता यंदाच्या जत्रेची तारीख देखील त्याचप्रमाणे जाहीर झाली आहे.यंदा ही जत्रा 22 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. कोणत्याही कॅलेंडर किंवा तिथीनुसार ही तारीख ठरत नसून देवीला कौल लावून ही तारीख ठरली जाते. आंगणेवाडी यात्रेच्या तारखेची अनेक जण आतुरतेने वाट पाहत असतात.
महाराष्ट्रातीलच नव्हे तर देश-परदेशात कोकणातील ज्या एका जत्रेचं आकर्षण आहे ती म्हणजे आंगणेवाडीची जत्रा. दरवर्षी लाखो भाविकांच्या गर्दीमध्ये मोठ्या उत्साहात भराडी देवीची जत्रा रंगते. मालवणमधील मसुरे गावातील आंगणेवाडीतल्या भराडी देवीच्या यात्रेला मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होत असतात. त्यासोबतच विविध पक्षाचे राजकीय नेते या यात्रेत सहभागी होतात.