रत्नागिरीच्या श्री विठ्ठल मंदिरात २० डिसेंबर रोजी संतश्रेष्ठ श्री गाडगेबाबा यांचा पुण्यतिथी कार्यक्रम
रत्नागिरी : रत्नागिरी येथील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल मंदिरात शुक्रवार दिनांक २० डिसेंबर २०२४ रोजी रत्नागिरी जिल्हा परीट समाज सेवा संघाच्यावतीने संत श्रेष्ठ श्री गाडगेबाबा यांचा ६८ वा पुण्यतिथी उत्सव विविध उपक्रमाने संपन्न होणार आहे. संत गाडगेबाबा नगरात स्वच्छता अभियानही राबविण्यात येणार आहे.
20 डिसेंबर रोजी श्री विठ्ठल मंदिरात सकाळी नऊ वाजता संतश्रेष्ठ श्री गाडगेबाबांच्या मूर्तीचे पूजन आरती आणि त्यानंतर दुपारी 11 ते 12 या वेळेत भजनाचा कार्यक्रम होईल दुपारी एक वाजता खिचडी प्रसाद वाटप करण्यात येईल त्यानंतर दुपारी ३ ते ५ या वेळात परीट समाज बांधवांच्या मेळाव्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येईल. सायंकाळी ५ ते ७ या वेळेत श्री. सतीश बुवा पांचाळ यांच्या भजनानंतर रात्री ८ वाजता धुपारतीने कार्यक्रमाची सांगता होईल. भाविकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन रत्नागिरी जिल्हा परीट समाज सेवा संघाच्या संयोजन समितीने केले आहे.