
नाणार रिफायनरी संदर्भात खासदार विनायक राऊत व आमदार राजन साळवी आज नाणार परिसराच्या दौऱ्यावर
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महा जनादेश यात्रेच्या निमित्ताने रत्नागिरी दौर्यावर आले असता नाणार रिफायनरीबाबत फेरविचार करण्याचे संकेत दिले होते. त्यावरून सध्या जिल्ह्यात वातावरण ढवळून निघाले आहे. नाणार रिफायनरी विरोधी समितीनेही आता बैठका सुरू केल्या आहेत. शिवसेनेने या प्रकल्प विरोधाची भूमिका कायम ठेवली आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. शिवसेना खासदार विनायक राऊत व स्थानिक शिवसेनेचे आमदार राजन साळवी आज नाणार परिसराला भेट देत असून ते ग्रामस्थांच्या बैठकीतही ते भाग घेणार आहेत. शिवसेनेच्या वतीने प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधला जाणार आहे. यासाठी तारळ मुळमवाडी येथे ग्रामस्थांचे बैठकीचे आयोजित करण्यात आले आहेत.यामध्ये शिवसेनेचे खासदार व आमदार कोणती भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
www.konkantoday.com