धामणंद येथील बीएसएनएलचा टॉवर बंद, ग्रामस्थांमध्ये संताप
खेड तालुक्यातील पंधरागाव विभाग गेल्या काही वर्षापासून विकासापासून दुर्लक्षित आहे. अशातच धामणंद येथे काही वर्षापूर्वी बीएसएनएलचा टॉवर उभारण्यात आला. मात्र हा टॉवर गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. या परिसरात माजी सैनिकांची संख्या अधिक आहे. त्यांनी सातत्याने वरिष्ठ अधिकारी तसेच केंद्रीय स्तरापर्यंत पत्रव्यवहार केला, तरीही बीएसएनएलची सेवा सुरू झालेली नाही. परिणामी या परिसरातील माजी सैनिक, ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. www.konkantoday.com