
राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने चिपळुणात पकडला ११ लाखांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा
राज्य उत्पादन शुल्कच्या रत्नागिरी भरारी पथकाने तालुक्यातील वैजी येथे ११ लाख ६४ हजार ६०० रुपये किंमतीचा गोवा बनावटीचा मद्यसाठा पकडल्याची खळबळजनक घटना काही दिवसांपूर्वी घडली. एका गोठ्यामधून हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी गोविंद नामदेव करकाळे (३६, वालोपे), विजय कृष्णा पवार (५०, कांदीवली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.www.konkantoday.com