अंजनवेल मुख्य मार्गावर होत असलेले चित्रिकरण सीआयएसएफकडून रोखण्याचा प्रयत्न.
गुहागर-अंजनवेल व गुहागर-वेलदूर हा मार्ग सार्वजनिक बांधकामाच्या मालकीचा आहे. रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पाची जागा वेगळी आहे. त्याला संरक्षण आहे. मग अंजनवेल मुख्य मार्गावर होत असलेले चित्रिकरण रोखण्याचा कंपनीचा सीआयएसएफला कोणताही अधिकार नाही. हा रस्ता त्यांच्या मालकीचा नाही. यापुढे कोणताही प्रकार सहन केला जार नाही. याला उत्तर देण्याची वेळ आली असल्याचे गुजरातचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी बोलताना सांगितले.डॉ. विनय नातू यांनी गुहागरमध्ये पत्रकारांजवळ बोलताना सीआयएसएफच्या या कृत्याबाबत नाराजी व्यक्त केली.
गुहागरला पर्यटन व त्यादृष्टीने येथील निसर्गसौंदर्यामुळे येत असलेले विविध चित्रपटांचे चित्रिकरण ही जमेची बाजू आहे. तालुक्याचे अर्थकारण वाढणार, येथील जनतेला विविध मार्गाने व्यवसायाला चालना देणारे हे उपक्रम कायम व्हावेत यामुळे याला कोणी विरोध करत असेल तर गुहागरमधील जनतेने याला योग्यवेळी उत्तर देवून या अडथळा आणणार्यांना योग्य जागा दाखवली. या मुख्य मार्गावर अंजनवेल गावच्या प्रवेशद्वारासमोर एका चित्रपटाचे काही सेकंदाचे चित्रिकरण सुरू झाले होते. तर त्या ठिकाणी आरजीपीपीएलचे सीआयएसएफने चित्रिकरण रोखले. हे अत्यंत चुकीचे आहे. www.konkantoday.com