स्वामी समर्थ मठ ते रामेश्वर मंदिर रस्त्याच्या धुळीवर पाण्याचे फवारे मरण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते पुढे आले.
चिपळूण शहरातील स्वामी समर्थ मठ ते रामेश्वर मंदिर दरम्यानच्या रस्त्याची पुरती दुर्दशा झाली आहे. डांबरी रस्ताच गायब होवून येथे केवळ माती शिल्लक राहिली आहे. यामुळे आजुबाजूच्या नागरिकांना प्रचंड धुळीचा त्रास सहन करावा लागत असल्याने त्यावर उपाय म्हणून सध्या या रस्त्यावर टँकरद्वारे पाण्याचे फवारे मारले जात आहेत.
सामाजिक कार्यकर्ते व विशेष कार्यकारी अधिकारी संदीपराव उर्फ अप्पा कदम यांनी स्वखर्चातून हा उपक्रम हाती घेतला आहे.www.konkantoday.com