मुंबईत जमिनीचा एक तुकडा 455 कोटींना विकला; ‘या’ एरियात झाली ही मोठी, कोण आहे खरेदीदार?
मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. मुंबईत मालमत्तांच्या किंमती अवाक्याबाहेर गेल्या आहेत. वर्षा अखेरीस मुंबईत सर्वात मोठी प्रॉपर्टी डिल झाली आहे. मुंबईती जमिनीचा एक तुकडा 455 कोटींना विकला केला आहे. मुंबईच्या सर्वात पॉश एरियात ही डिल झाली आहे. जाणून घेऊया कोणी खरेदी केला हा जमिनीचा तुकडा.
दक्षिण मुंबई हा मुंबईचा सर्वात महागडा परिसर म्हणून ओळखला जातो. तर, पश्चिम मुंबईचा परिसर तितकाच ग्लॅमरस. वांद्रे, जुहू, अंधेरी सात बंगला, लोखंडवाला या परिसरात अनेक सेलिब्रिटी राहतात. यामुळे दक्षिम मुंबई प्रमाणचे पश्चिम मुंबई देखील तितकाच पॉश एरिया आहे. यामुळे येथील जागांना देखील मोठी डिमांड आहे. मुंबईच्या जुहू परिसरात जमिनीचा एक तुकडा 455 कोटींना विकला गेला आहे. 19, 589, 22 चौरस फूट जमिनीचा तुकडा 455 कोटींना विकला गेला आहे.
अग्रवाल होल्डिंग्ज नावाच्या कंपनीने ही जमीन खरेदी केली आहे. या जमिन खरेदीच्या व्यवहारात स्टॉप ड्युटी म्हणून 27.30 कोटी रुपये भरण्यात आले आहेत. अग्रवाल होल्डिंग्जने शापूरजी पालोनजी ग्रुपकडून ही जमीन विकत घेतली आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये हा सौदा झाला. अग्रवाल होल्डिंग्स ही एक फायनान्स कंपनी आहे. ही कंपनीमार्फत बँकिंग आणि गुंतवणूक कंपन्यांना सेवा पुरवली जाते. ही कंपनी बँका, गुंतवणूक संस्था आणि विमा कंपन्यांसारख्या वित्तीय संस्थांना सेवा पुरवते. याआधीही अग्रवाल होल्डिंग्सने मुंबईत जमिनीचा व्यवहार केले आहेत. 2022 मध्ये, कंपनीने मुंबईतील सांताक्रूझ येथे 75,000 चौरस फूट जमीन 332.8 कोटींना खरेदी केली होती.
ही जमीन कंपनी आपल्या पुनर्विकास प्रकल्पासाठी वापरणार आहे.जुहू हा पश्चिम मुंबईतील एक अलिशान परिसर आहे. जुहू समुद्र किनाऱ्याला लागून असलेल्या या परिसरात देशातील अनेक बड्या उद्योगपती, बॉलीवुड सेलिब्रीटी यांचे बंगले आणि अपार्टमेंट्स आहेत. यामुळे परिसरात प्रॉपर्टीच्या किंमती खूपच जास्त आहेत.