ही मागणी मूर्खपणाची आहे. कर्नाटक सरकार बालिश विधाने खपवून घेणार नाही,- कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा आदित्य ठाकरे यांना इशारा.
मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी बेळगाव कारवार हा केंद्रशासित प्रदेश जाहीर करावा, अशी मागणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली. त्यांच्या मागणीला कर्नाटक काँग्रेसने बालिश मागणी असे म्हटले आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्याची शक्यता आहे.महाराष्ट्र आणि बेळगावमधील मराठी जनता अत्याचार सहन करीत आहे. तेथील स्थानिक मराठी लोक तर हिंदूच आहेत, मग भाजप याप्रश्नी का भूमिका घेत नाही? असा सवाल विचारीत बेळगाव कारवार हा केंद्रशासित प्रदेश जाहीर करण्यासंबंधी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा.
आम्ही प्रस्तावाला पाठिंबा देऊ, असे आदित्य ठाकरेम्हणाले. त्यांच्या याच मागणीवर कर्नाटकचे काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी संताप व्यक्त केला आहे.बेळगाव आणि कारवारला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याबाबत आदित्य ठाकरे यांचे वक्तव्य हे बालिशपणाचे आहे, असा टीका मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांनी केली आहे. बेळगावबाबतचा महाजन आयोगाचा अहवाल अंतिम आहे. या जिल्ह्याचा महाराष्ट्रात समावेश व्हावा, ही मागणी मूर्खपणाची आहे. कर्नाटक सरकार बालिश विधाने खपवून घेणार नाही, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हणाले.