राज्य शासन देखील शाळांच्या शैक्षणिक वर्षाची सुरवात आता १ एप्रिलपासून करण्याच्या तयारीत.
सीबीएसई’च्या पॅटर्नप्रमाणेच आता राज्य शासन देखील शाळांच्या शैक्षणिक वर्षाची सुरवात आता १ एप्रिलपासून करण्याच्या तयारीत आहे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने नेमलेल्या सुकाणू समितीने तशी शिफारस राज्य शासनाला केली आहे.२०२६-२७ पासून त्याची राज्यात अंमलबजावणी केली जाणार आहे, पण तत्पूर्वी शासनाचा अंतिम आदेश काढला जाणार आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार बालवाडी ते इयत्ता दुसरीपर्यंत पहिला, तिसरी ते पाचवीपर्यंत दुसरा आणि नववी ते बारावीपर्यंत तिसरा टप्पा करण्यात आला आहे.
इयत्ता नववीपासून विद्यार्थ्यांना एक स्थानिक भाषा व दुसरी देशातील कोणतीही किंवा परदेशी एक भाषा निवडता येईल. विषयांची मर्यादा कमी होणार असून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार विषय निवडता येणार आहेत.