
रंगसंगत कार्यशाळा
दि. २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या कालावधी दरम्यान रत्नागिरी येथे अतुल पेठे यांची रंगसंगत कार्यशाळा आर्ट सर्कल फाउंडेशनच्या वतीने रत्नागिरीत आयोजित केली आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक, अभिनेते अतुल पेठे यांच्या बरोबर अभिनेता ओंकार गोवर्धन आणि प्रकाशयोजनाकार प्रदीप वैद्य यांचेही मोलाचे मार्गदर्शन कार्यशाळेत लाभणार आहे. पाचही दिवस ही कार्यशाळा सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालेल.
नाटक का, कशासाठी, कोणासाठी, कसं करायचं, त्यासाठी अभ्यास काय करायचा, शरीर आणि वाचेचे व्यायाम कोणते, सर्जनशीलता म्हणजे काय, नाटकाची मूलभूतता काय हे सगळं अत्यंत मजेशीर पद्धतीने, खेळीमेळीच्या वातावरणात तीनही मार्गदर्शक उलगडतात. नाटक करणार्या प्रत्येकासाठी ही कार्यशाळा म्हणजे नवीन काहीतरी आणि जुनं काहीतरी नव्या दृष्टीने शिकण्याची संधी आहे. 18 ते 50 या वयोगटातील असलेल्या या कार्यशाळेमध्ये फक्त 30 जागा उपलब्ध आहेत. तेव्हा लवकरात लवकर नोंदणी करा.
या कार्यशाळेसाठी रुपये 1500 इतके शुल्क आकारण्यात येणार आहे. या शुल्कामध्ये दुपारचे जेवण, सायंकाळचा अल्पोपहार आणि दोन वेळा चहा या सर्वाचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा : ७७७५८७७६०६/९४२३८७७६०६ या क्रमांकावर.