मच्छीमार हैराण, वार्यामुळे मासळी कमी प्रमाणात
. समुद्रात सलग तीन दिवस ते आठवड्यापर्यंत मासेमारी करण्यासाठी जाणार्या मच्छीमार नौका पहाटे समुद्रात जाऊन सकाळी बंदरात परत येत आहेत.त्याचबरोबर वार्यामुळे मासळी कमी प्रमाणात मिळत असल्याचे मच्छीमारांकडून सांगण्यात आले. वार्यामुळे मासा स्थलांतरित होत असल्याने मासळी मिळण्याचा ‘रिपोर्ट’ चांगला नसल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
मासेमारीसाठी जाणार्या नौकांना मासळी पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने काही नौका मासेमारीसाठी न जाता समुद्रातच उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे वार्यामुळे होणारा धोका आणि मासळी मिळत नसल्याने होणारा तोटा कमी करण्याचा प्रयत्न नौका मालकांकडून केला जात आहे.