तो तरुण दैव बलवत्तर म्हणून अपघातातून थोडक्यात बचावला, पहा व्हिडिओ.
मुंबईच्या कुर्ला भागात एका भरधाव बेस्ट बसने अनेकांना उडवलं आहे. या अपघातात आतापर्यंत एकूण पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर ३१ जण जखमी झाले आहेत.भीषण अपघाताचा आणखी एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
ज्यात एक तरुण दैव बलवत्तर म्हणून अपघातातून थोडक्यात बचावला आहे. ज्या रस्त्यावरून ही बस धावत मार्केटमध्ये घुसली, त्या रस्त्यावर हा तरुण आणखी एका तरुणासोबत दुचाकीसोबत उभा होता.
तितक्यात दोघांच्या पाठीमागून भरधाव वेगात बस आली, या दोघांपैकी एकाला बसने जोरदार धडक देत चिरडत पुढे नेलं.मात्र या सगळ्या घटनेत हा तरुण थोडक्यात बचावला. त्यानं डोळ्यादेखल मृत्यूतांडव पाहिला. अपघातातून बचावल्यानंतर हा तरुण घाबरलेल्या अवस्थेत दिसला. अपघातातून बचावल्यानंतर तो धावत सुरक्षित ठिकाणी गेला आणि खाली बसला.