
चिंचखरी फाटकवाडी येथे शुक्रवारपासून दत्तजयंती उत्सव
रत्नागिरी: शहराजवळील चिंचखरी फाटकवाडी येथे शुक्रवार दि.१३ डिसेंबर ते रविवार दि.१५ डिसेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत दत्तजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.शुक्रवारी दि.१३ डिसेंबर रोजी सकाळी १०.४५ वाजता आरती, सकाळी ११ वाजता अखंड नामजपाची सुरुवात होणार आहे. शनिवार दि.१४ डिसेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता नामजपाची सांगता होणार आहे. दुपारी १२.३० नंतर प्रसाद, सायंकाळी ५ वाजता ह.भ.प. कौस्तुभ फाटक यांचे दत्तजन्माचे कीर्तन त्यानंतर महाप्रसाद. रविवार दि.१५ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता तुळशी व फुले सहस्रनाम पादुकांवर वाहणे. व महाप्रसाद सायंकाळी ६ वाजता सत्यनारायण पूजा ७.३० ते ९ भजनसेवा असे कार्यक्रम होणार आहे. सर्व भक्तगणांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन समस्त फाटक कुटुंबियांनी केले आहे.