
घनकचरा प्रकल्प राविणार्या गृहनिर्माण संस्थांसह संकुलाना मिळणार सर्वोत्कृष्टचे मानांकन.
खेड शहर कचरामुक्त करण्यासह नागरिकांचे आरोग्यमान सुदृढ ठेवण्यासाठी घनकचरा व्यवस्थापनांतर्गत सर्वोत्कृष्ट गृहनिर्माण संस्था अन आदर्श संकुल स्पर्धा राबवण्याचा निर्णय येथील नगरपरिषदेने घेतला आहे. गृहनिर्माण संस्थांसह संकुलांना सर्वोत्कृष्ट मानांकन दिले जाणार आहे. वर्षभर ४ टप्प्यात राबवण्यात येणार्या स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे. सर्वाधिक गुण प्राप्त करणार्या गृहनिर्माण संस्थांसह संकुलांना मालमत्ता करात सवलत दिली जाणार आहे.खेड नगरपरिषद तालुका पत्रकार संघ, खेड लायन्स क्लब, खेड रोटरी क्लब, खेड जेसीस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने घनकचर्याचे योग्य तर्हेने व्यवस्थापन करून कचरामुक्त शहर निर्माण करण्यासाठी हा अनोखा उपक्रम राबवण्यात येणार आहे.www.konkantoday.com