लांजा पंचायत समिती तालुक्यात ६०० वनराई बंधारे बांधणार.
लांजा तालुक्यात दरवर्षी पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. यावर्षी पाणीटचाई तीव्र होवू नये, यासाठी पंचायत समिती प्रशासन सतर्क झाले आहे. पाणीटंचाई निवारण करण्याच्या दृष्टीने २०२४-२५ यावर्षीसाठी संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला नसला तरी तत्पूर्वीच लांजा पंचायत विभाग सतर्क झाला आहे. लांजा तालुक्यात ६०० वनराई बंधारे बांधण्याचा संकल्प केला आहे.पाणीटंचाई निवारणासाठी आमदार आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यामध्ये लवकरच प्रशासनाची एक बैठक होणार असल्याचे समजते.
या बैठकीत लांजा तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांना मागणीनुसार व पाणीपुरवठा नियोजन केले जाणार आहे. लांजा तालुक्यामध्ये नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यानंतर पाणी टंचाई भासण्यास सुरूवात होते. तर फेब्रुवारी मार्चमध्ये पाणीटंचाईचे स्वरूप तीव्र होत असते. तालुक्याच्या दुर्गम भागातील गावांना प्रथम पाणीटंचाईची झळ सोसावी लागते.www.konkantoday.com