
रत्नागिरी तालुक्यातील टिके फुटकवाडी येथे वृध्दाची आत्महत्या.
रत्नागिरी तालुक्यातील टिके फुटकवाडी येथे वृध्दाने गवत मारण्याचे औषध घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार 6 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.45 वा. सुमारास घडली. यशवंत तानाजी वारिशे (65, रा.टिके फटकवाडी, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या वृध्दाचे नाव आहे.शुक्रवारी सायंकाळी जिवनाचा कंटाळा आल्याने त्यांनी घरात कोणीही नसताना गवत मारण्याचे ग्रामोझोन नावाचे विषारी औषध प्राशन केले.
काही वेळाने त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु असताना शनिवार 7 डिसेंबर रोजी सकाळी 5.20 वा. त्यांचा मृत्यू झाला.