
रत्नागिरीतील सोमेश्वरच्या प्रसिद्ध पावट्याचे मार्केटींग होणार
रत्नागिरी शहरानजिकच्या काजळी नदीकिनारी परिसरात लागवड करण्यात येणारा आणि हा खाडी परिसर असल्यामुळे उत्कृष्ट चवदार पावट्याचे महत्व पार मुंबईपर्यंत पोचलेले आहे. गेली अनेक वर्षे होत असलेल्या या पावट्याची दखल आता शासन दरबारी घेण्यात आली आहे. त्यासाठी कृषी विभागाने हेक्टरी ७ हजार ५०० रुपये अनुदान बियाण्यासाठी देण्याचे निश्चित केले आहे. या माध्यमातून वाणाचे संवर्धनासाठी अन्य शेतकरीही वाणाची लागवण करण्यासाठी उद्युक्त केले जाणार आहे.
कृषी विभागाच्या पारंपारिक बियाणे संवर्धन योजनेंतर्गत रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर येथील चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या पावट्याचे संवर्धन आणि मार्केटींग करण्यात येणार आहे. या अभिनव उपक्रमात सोमेश्वर येथील शेतकर्यांकडून बियाणे विकत घेतल्याची पावती दाखवल्यानंतर या अनुदानाचा लाभ कृषी विभागाकडून मिळणार आहे.www.konkantoday.com




