
मुंबईतील कुर्ला परिसरात सोमवारी रात्री एका बसने अनेकांना चिरडल्याची घटना, तीन ठार, 17 जखमी.
मुंबईतील कुर्ला परिसरात सोमवारी रात्री एका बसने अनेकांना चिरडल्याची घटना समोर आली आहे. बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक वाहनांचेही नुकसान केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.तर 17 जण जखमी झाले आहेत. तर अद्याप अधिकृतपणे मृतांचा आकडा समोर आला नाही. मात्र मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अपघातातील अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत असून पोलिसांनी बस चालकाला अटक केली आहे.
अपघाताचा अनुभव प्रत्यक्षदर्शीने सांगितला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला (पश्चिम) येथील एसजी बर्वे रोडवरील अंजुम-ए-इस्लाम शाळेजवळ सोमवारी रात्री बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट बसची काही वाहनांना धडक बसली. ज्यात किमान १७ जण जखमी झाले आहेत.आंबेडकर नगर येथील बुद्ध कॉलनीजवळ बस येताच अचानक बसचा ताबा सुटला. यानंतर बसने अनेक जणांना चिरडले. या घटनेत काहींच्या अंगावरून बस गेली, तर काहींच्या पायावरून बस गेली. यामुळे अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच यात महिला, पुरुष आणि चिमुकलेही मृत्यूमुखी पडले आहे.या घटनेतील बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याचे सांगत आहेत. मात्र तो मद्यधुंद अवस्थेत बस चालवत असल्याची शक्यता आहे, असं त्यानं सांगितलं आहे.