
भाजपचे विधान परिषदेतील आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी.
भाजपचे विधान परिषदेतील आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मनीष निकोसे नावाच्या व्यक्तीकडून आमदार लाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.तसेच त्यांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ देखील करण्यात आली आहे. या प्रकरणात प्रसाद लाड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा आमदार प्रसाद लाड यांना या मनीष निकोसे नावाच्या व्यक्तीनं जीवे मारण्याची धमकी देत शिविगाळ केल्याचं समोर आलं आहे. या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घ्यावं तसेच त्याची कसून चौकशी करावी अशी मागणी प्रसाद लाड यांनी पोलिसांकडे केली आहे.