नवनिर्वाचित आमदार किरण सामंत यांच्या एका कॉलनंतर राजापूर शहरात विद्युत पुरवठा सुरळीत.
गेले अनेक तास राजापूर शहरांमध्ये विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता नगरपरिषदेने गेले कित्येक वर्षाचे असणारे विद्युत बिल न भरल्याने नाहक राजापूर जनतेला हा त्रास सोसावा लागत असल्याने शहरातील नागरिकांनी नगर परिषदेच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. राजापूर शहरातील खंडित केलेला विजेचा प्रश्न नवनिर्वाचित आमदार किरण सामंत यांना फोन द्वारे कळविण्यात आला आमदार किरण सामंत हे सध्या अधिवेशनाच्या निमित्ताने मुंबई येथे असल्याने त्यांनी तात्काळ जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी संबंधित विभागाला फोन लावून तात्काळ विद्युत पुरवठा सुरळीत करा असे आदेश दिले आहेत. त्यांच्या आदेशानंतर महावितरणाचे अधिकारी कामाले लागले असून राजापूर शहरात पुन्हा एकदा रोषणाई पाहायला मिळाली.
मात्र आता राजापूर जनतेला नेमका प्रश्न पडायला की माजी नगराध्यक्ष आणि त्यांच्या सहकार्याने गेल्या पाच वर्षात केले तरी काय हा मोठा प्रश्न आता त्यांच्यासमोर उभा राहिला आहे? मिळालेल्या माहितीनुसार राजापूर शहरातील गेल्या अनेक वर्षांचे महावितरणचे १५ लाखाचे विद्युत बिल अजूनही प्रलंबित आहे.त्याबाबत महावितरणाकडून नगरपरिषद राजापूर यांना वारंवार पत्रव्यवहार करून विद्युत बिल भरण्याच्या सूचना देण्यात आले आहेत मात्र हम करे सो कायदा….. असे असणारे काही लोकप्रतिनिधींनी या विद्युत बिलाकडे दुर्लक्ष करत जनतेला नाहक वेठीशी धरण्याचे काम करत असल्याने राजापूर येथील नागरिकांनी नगरपरिषद विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. अजून किती दिवस आम्ही अंधाराचा सामना करायचा आम्ही वेळात नगर परिषदेची सर्व कर परिपूर्ण भरत आहोत मात्र तरी सुद्धा नगरपरिषदेच्या अंदादुंडी कारभारामुळे जनतेला वेठीस धरण्याचं काम केल्याने आता नागरिकांमध्ये नाराजीचा सुरू उमटला आहे.
आमदार किरण सामंत यांच्या ख्यातीनुसार त्यांच्या कार्यकर्त्यांनी हा प्रश्न फोन द्वारे त्यांच्या कानावर घातला मात्र त्यांनी कोणताही विचार न करता तात्काळ यंत्रणा हलवत येथील महावितरणाच्या अधिकाऱ्यांना सूचना देत जनतेला त्रास होईल असं कोणतेही काम करू नका थकीत असलेल्या बिलाबाबत मी आल्यानंतर तात्काळ मार्ग काढू असे ही आमदार किरण सामंत यांनी सांगितले त्यानुसार तात्काळ शहरातील खंडित केलेली विद्युत पुरवठा सुरळीत करा असे आदेश दिले. आणि अखेर आमदार किरण सामंत यांच्या एक कॉल नंतर राजापूर शहरातील प्रॉब्लेम सॉल झाल्याचे पुन्हा एकदा पाहायला मिळाले. त्यामुळे राजापूर शहरातील समस्त नागरिकांनी नवनिर्वाचित आमदार किरण सामंत यांचे मनापासून आभार मानले आहेत.