दशावतार’ चा चौथ्या आठवड्यातही दबदबा; बॉलिवूड सिनेमांना टक्कर देत महाराष्ट्रात तब्बल इतके शो!

मुंबई : बॉलिवूडच्या बिग बजेट सिनेमांनाही धडकी भरवणाऱ्या ‘दशावतार’चा चौथ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर दबदबा पाहायला मिळाला आहे.हिंदी चित्रपटांच्या लाटेत महाराष्ट्राचा महासिनेमा ‘दशावतार’ चित्रपटानं आपला गड राखून ठेवलाय.

‘दशावतार’ नं चौथ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर आपलं स्थान हलू दिलेलं नाहीए. चौथ्या आठवड्यात देखील ‘दशावतार’ दिडशे थिएटर्समध्ये सुरू आहे. ‘दशावतार’चे सुमारे दोनशेच्या वर शो तुफान गर्दीत सुरु आहेत.

ओशन फिल्म्सची निर्मिती आणि झी स्टुडिओची प्रस्तुती असलेल्या सुबोध खानोलकर लिखित दिग्दर्शित ‘दशावतार ‘ चित्रपटानं गेले तीन आठवडे थिएटरमध्ये रसिकांचा धो धो वर्षाव पाहिला. अमेरिकेत शंभरहून जास्त शो होत आहेत तर ऑस्ट्रेलिया, जपान, जर्मनी, आखाती देशातही ‘दशावतार’ ने आपला झेंडा फडकवला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत बऱ्याच काळानंतर हे सळसळते चैतन्य लोकांना अनुभवायला मिळालंय. दशावतार मुळे चित्रपट गृहांनी गणेशोत्सवानंतर लागलीच आपली दिवाळी साजरी केली.

कमाई किती?

दशावतारनं आतापर्यंत २३ कोटींच्या जवळपास कमाई केली आहे.

बंद चित्रपट गृहांची दारं उघडली
कोकणातील अनेक बंद चित्रपट गृहांची दारे ‘दशावतार’ नं पुन्हा उघडली. तर पूर्ण वर्षभराचे उत्पन्न कोकणातील चित्रपटगृहांनी एकट्या ‘दशावतार’ वर कमावलंय. काही खेड्यांमध्ये कंटेनर थिएटर ‘ दशावतार ‘ चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या दारात पोहोचले. या चित्रपटाने लोकांचा उदंड प्रतिसाद तर मिळवलाच पण मराठी चित्रपट, नाटक आणि सामाजिक वर्तुळात ‘दशावतार’ ची खूप प्रशंसा झाली.

‘दशावतार ‘ चित्रपटानं फक्त बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवला नाहीए तर जनमानसात एक चळवळ उभी करण्याचं कामही केलं आहे. कोकणातील जमिनी, देवराया, निसर्ग वाचवण्यासाठी कोकणी माणूस पुढाकार घेताना आज दिसत आहे.

कोकणातील कातळशिल्पांबाबत, त्याच्या संवर्धनासाठी तो सजग झाला आहे. नुकताच ( २७ सप्टेंबर २०२५) जागतिक पर्यटन दिनानिमित्त एमटीडीसीने निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी यांच्याशी कातळशिल्पं जतन, संवर्धन, प्रचार, प्रसार आणि प्रसिद्धीसाठी सामंजस्य करार केला आहे. यामुळं कोकणातील अश्मयुगीन कातळशिल्पांचा विकास होणार

दरम्यान, दशावतारी कलाकार यांना पुन्हा एक तेजी मिळवून देण्यासाठी हा चित्रपट कारणीभूत ठरतो आहे. कोकण आणि गोवा इथवरच मर्यादित असलेल्या दशावतारी नाटकांना पुण्या मुंबईतून खेळांची मागणी येत आहे.

https://chat.whatsapp.com/JdTscwkK04n3RWNSijpnIq?mode=ems_copy_t

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button