
आजरा येथ हत्ती हूसकावण्यासाठी गेलेल्या वन कर्मचारी व ग्रामस्थांच्या समूहावर हत्तीने प्रती हल्ला केल्यानेहत्तीच्या हल्ल्यात वनकर्मचारी ठार
आजरा :
हत्ती हूसकावण्यासाठी गेलेल्या वन कर्मचारी व ग्रामस्थांच्या समूहावर हत्तीने प्रती हल्ला केल्याने या हल्ल्यात वन कर्मचारी प्रकाश गोविंद पाटील (वय ५४) हे ठार झाले.कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात असणाऱ्या घाटकरवाडी येथील जंगलामध्ये सदर घटना घडली. गेली दहा वर्षे हत्तीचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत असतानाच आज वन विभागाच्या कर्मचाऱ्यालाच मृत्यूला सामोरे जावे लागल्याने आता तरी हत्तीचा बंदोबस्त होणार का ? असा प्रश्न सर्वसामान्य उपस्थित केला जात आहे.
गेले आठ दिवस घाटकरवाडी परिसरात धुमाकूळ घातलेल्या हत्तीला हूसकावण्याची मोहीम आज वनविभाग व ग्रामस्थांनी राबवली.सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सदर मोहीम राबवत असताना हत्ती बाजूला गेला आहे असे समजून त्याच्या पाठीमागून जात असताना अचानकपणे समोरच्या झुडपातून येऊन हत्तीने हुसकावण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थ व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर हत्तीने हल्ला केला.यामध्ये वनकर्मचारी प्रकाश गोविंद पाटील हे ठार झाले. प्रकाश पाटील यांचे मूळ गाव गवसे हे आहे.
या घटनेमुळे विभागासह आजरा तालुकावासीयामध्ये घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
www.konkantoday.com