प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीवर अशासकीय सदस्य नेमणुकीसाठी 15 डिसेंबरपर्यंत अर्ज करा
रत्नागिरी, दि. 9 : प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीवर अशासकीय सदस्य नेमणुकीसाठी 15 डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त तथा सदस्य सचिव जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती यांनी केले आहे.
जिल्ह्यामध्ये प्राणी क्लेष सोसायटीची स्थापना झाली असून, समितीमध्ये अशासकीय सदस्यांची निवड करण्यात आली होती. परंतु, अशासकीय सदस्यांची नियुक्तीची मुदत संपली असल्याने अशासकीय सदस्यांची पुनःरचना करण्यासाठी पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याकडे पंचायत समिती स्तरावर अर्ज व अधिसूचना उपलब्ध आहे. तरी इच्छुकांनी पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याकडे अर्ज करावेत.
अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत 15 डिसेंबर 2024 आहे.
खालील निकषांची पूर्तता करणारी व्यक्ती अर्ज करु शकते. सदरची व्यक्ती संबंधित जिल्ह्यातील गोशाळा/पांजरपोळ संस्थांपैकी एका संस्थेला अध्यक्ष असावी. प्राणी कल्याण विषयक कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी २ व्यक्ती, सर्वसाधारण समितीने नामनिर्देशित केलेल्या दोन व्यक्ती, संबंधीत जिल्ह्यातील मानवहितकारक कार्य करणारे/प्राण्यांवर प्रेम करणारे/प्राणी कल्याणासाठी काम करणारे पाच ते सहा कार्यकर्ते. 000