
सरकारी घर घेऊनही निकम यांनी हॉटेलची बिले उकळली! सचिन सावंत यांनी सादर केली बिले
राज्य सरकारने 2 टक्के स्वेच्छाधिकार कोट्यातून ॲड. उज्ज्वल निकम यांना वर्सोवा भागात घर देऊनही त्यांनी 2011 ते 2014 या कालावधीत मुंबईत राहण्यासाठी हॉटेल बिलापोटी सुमारे 17 लाख रुपये उकळले, असा गौप्यस्पह्ट प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज केला.पत्रकार परिषदेत बोलताना सचिन सावंत यांनी उत्तर-मध्य मुंबईतील भाजपचे उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम यांच्यावर हा आरोप केला. सरकारी कोट्यातून मंजूर झालेले घर, त्यांच्या फीबाबतचा शासननिर्णय, तसेच त्यांनी आकारलेली बिले यांचे पुरावे सचिन सावंत यांनी सादर केले. त्यामुळे नैतिकतेच्या पातळीवर ॲड. उज्ज्वल निकम यांना बोलण्याचा काहीही अधिकार नाही, असे सावंत यांनी सुनावले.www.konkantoday.com