
चिपळुणातील नाट्यगृहाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आचारसंहितेआधी होणार
चिपळुणातील अनेक वर्षे बंद असलेल्या व त्यानंतर आता नूतनीकरण करण्यात आलेल्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे शुभारंभ मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते करण्याचे नगराध्यक्ष सौ सुरेखा खेराडे व त्यांच्या सहकाऱयांचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस रत्नागिरी दौऱयावर येणार होते परंतु पूरग्रस्त परिस्थितीमुळे त्यांचे हे दौरे रद्द झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा अद्यापही निश्चित झालेला नाही यामुळे नाट्यगृहाचा शुभारंभ पुढे जात आहे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या नाट्यगृहाचा शुभारंभ व्हावा यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
www.konkantoday.com