
तुमच्यासोबत लोकमत आहे, तर बॅलेटवर सिद्ध करा-सुषमा अंधारें.
ईव्हीएमचा मुद्द्याभोवती चर्चेने फेर धरला असून, सोशल मीडियावर महाविकास आघाडीविरुद्ध महायुती समर्थक यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. महायुतीचे नेतेही महाविकास आघाडीचे आरोप फेटाळून लावत असून, जमिनीवर काम करण्याचा सल्ला देत आहेत.”कुणावरही ईडीची धाड पडली की, भाजपचे लावारिस भक्तुल्ले चेकाळून म्हणतात, कर नाही त्याला डर कसली? मग लोकांनी ईव्हीएमवर आक्षेप घेतल्यावर आपापल्या नेत्यांना सांगा ना, घ्या बॅलेटवर निवडणुका””तुम्ही ईव्हीएम सेट नाही केले. तुमच्यासोबत लोकमत आहे, तर बॅलेटवर सिद्ध करा. कर नाही त्याला डर कसली?”, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.