
शिवप्रेमींनी २८ ऑगस्टला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे घाईघाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते.या पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे आरोप आता विरोधक करत आहेत.शिवप्रेमींनी २८ ऑगस्टला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. त्याबाबत एक पत्रक काढून ‘महाराष्ट्र बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचे आवाहन शिवप्रेमींकडून करण्यात आले आहे.आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना सरकारच्या नाकर्तेपणा मुळे झाली आहे. आपण छत्रपतींचे त्यांच्या विचारांचे पाईक आहे. आज जर आपण बोललो नाही तर पुन्हा तेच होणार. याचा जाहीर निषेध 28 तारखेला शिवप्रेमी जनतेच्या वतीने उत्स्फूर्त होऊन #महाराष्ट्र_बंद करू या..!!!आपल्या महाराजांच्या पाऊलावर पाऊल ठेवून शेतकऱ्याच्या शेताच्या देठाला सुध्दा हात लागणार नाही याची काळजी आपण घेऊ. राज्यातील अत्यावशंक सेवा सोडल्यास लोकांना सर्वांनी महाराजांच्या सन्मानाखातर ह्या बंदला आपण उत्स्फूर्त प्रतिसाद देऊ.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचा शिंदे आणि भाजपने फक्त स्वार्थी राजकारणासाठी वापर केला आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. सरकारची कंत्राटदार धार्जिणी राजवट ह्याला कारणीभूत आहेच, पण त्याहूनही घातक अशी भाजपाची मानसिकता कारणीभूत असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.