किरण उर्फ भैया सामंत यांनी विधानसभेत रविवारी आमदारकीची मराठीत शपथ घेतली.
मी किरण स्वरुपा रवींद्र सामंत अशी सुरुवात करीत किरण उर्फ भैया सामंत यांनी विधानसभेत रविवारी आमदारकीची मराठीत शपथ घेतली. निवडणुकीपूर्वीच त्यांनी राजापूर मतदारसंघातील गावागावातून जात, ग्रामीण भागातील मतदारांच्या अडचणी समजून घेतल्या आहेत.रविवारी विधानसभेत गेलेल्या किरण सामंत यांनी आमदारकीची शपथ घेतली. राजापूर मतदारसंघात विकास कामाची गंगा आणणार असून विकास कामांना प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.