
आता काय तर म्हणे ७० वर्षांच्या अंध आजीबाईंची कोरोना लस घेतल्यानंतर दृष्टी परत आली
कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर लोकांकडून चित्रविचित्र दावे केले जात आहे. कुठे घरातील स्टीलची भांडी अंगाला चिकटतात, तर कुठे लोखंड अंगाला चिकटतं. यातून विविध गैरसमज निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत ७० वर्षांच्या अंध आजीबाईंची कोरोना लस घेतल्यानंतर दृष्टी परत आल्याचा दावा नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. परिसरात असंही म्हंटलं जात आहे की, कोरोनाची लस घेतल्यामुळे आजींनी आता जग पाहता येणार आहे.
रिसोड (वाशीम) बेंदरवाडी येथे ७० वर्षांच्या मथुराबाई बिडवे मागील ९ वर्षांपासून अंधपणाचं जीवन जगत आहेत. १० वर्षांपासून मोतीबिंदूमुळे त्यांची बुबूळं पांढरी झाली होती.
त्यातून त्यांना दिसायचं बंद झालं होतं. मथुराबाई या मूळच्या जालना जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. त्यांना पती आणि मुलं नसल्यामुळे नातेवाईकांनी रिसोडमध्ये आणलं. दरम्यान, २६ जूनला रिसोडला जाऊन कोरोनाची लस देऊन आणलं. त्यांना कोविशिल्डचा पहिला डोस देण्यात आला आणि ९ वर्षांपासून अंधत्व आलेल्या मथुराबाईंना चक्क दिसायला लागलं, असा दावा नातेवाईकांकडून करण्यात आला आहे.यावर वाशिमचे जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. मधुकर राठोड म्हणाले की, “कोरोनाची लस घेतल्यामुळे अंधत्व नष्ट होऊन दृष्टी येणं, ही बाब शक्य होईल असं वाटत नाही. पण, जुन्या आजारांवर लस मात करत असेलही. परंतु, अंध माणसाची दृष्टी येणं शक्यच नाही. तरीही संबंधित व्यक्ती आम्ही रुग्णालयात आणून त्यांची तपासणी करणार आहोत”.
www.konkantoday.com
