
स्वामी स्वरूपानंद पत संस्थेला सलग १० व्या वर्षी बँको ब्लू रिबन सन्मान घोषित
स्वामी स्वरूपानंद पत संस्थेला २५० ते. ३५० कोटी ठेव वर्गा मध्ये ब्लू रिबन सन्मान घोषित झाला आहे. सलग १० व्या वर्षी हा सन्मान संस्थेला प्राप्त होत आहे.
अविज पब्लिकेशन व गॅलेक्सी इनमा या संस्था प्रति वर्षी संस्था ना सन्मानित करतात. हा सन्मान हा संस्थे ने सहकारी आर्थिक क्षेत्रात केलेले शिस्तबद्ध काम संस्थेची लोकप्रियता , विश्वसार्हता याची पावती म्हणावी लागेल सलग १० वर्ष असा सन्मान प्रात करणारी संस्था अशी बिरुदावली स्वामी स्वरूपानंद पत संस्थेला प्राप्त झाल्या बद्दल मनस्वी आनंद होतो असे संस्थेचे अध्यक्ष दिपक पटवर्धन म्हणाले. हा पुरस्कार प्रात करण्या मागे ४५ हजार सभासदांची प्रेरणा हीच मोठी ताकद असल्याचे अध्यक्षांनी आवर्जून नमूद केले.