
संगमेश्वर तालुक्यातील मौजे कळंबस्ते खड्ड्यात पडून वृद्धाचा मृत्यू.
संगमेश्वर तालुक्यातील मौजे कळंबस्ते शास्त्रीनदीच्या पात्रालगत कातळी येथे खड्ड्यामध्ये पडून दुखापत झाल्याने अव्यज शौकत हुसेन मोडक (६२, रा. नायरी मोहल्ला) या वृद्धाचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.अव्यज शौकत हुसेन मोडक हे शनिवारी ६ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या पूर्वी मौजे कळंबस्ते शास्त्रीनदीच्या लगत प्रातःविधीसाठी गेले असता तेथून परत येत असताना पाखाडीवरून तोल जावून तीन फूट खोल खड्ड्यामध्ये पडून त्यांच्या डोक्याला दुखापत होवून पडले. येथे त्यांचा मृत्यू झाला. www.konkantoday.com