शरद पवार यांच्या आरोपाला देवेंद्र फडणवीस यांचे रोखठोक उत्तर, लोकसभेची आकडेवारी समोर ठेवली.

कोल्हापूरमध्ये बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाची आकडेवारी देत काही प्रश्न उपस्थित केले होते.काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत 80 लाख मतं पडली तरी त्यांच्या 16 च जागा आल्या आणि शिवसेना शिंदे गटाला 79 लाख मतं पडली काँग्रेसपेक्षा एक लाख कमी मत पडली तरी त्यांच्या 57 जागा आल्या असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेला झालेल्या मतदानाची आकडेवारी देऊन चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

फडणवीसांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे.’श्री शरद पवार साहेब, आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका. जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा? चला 2024 लोकसभेत काय झाले ते पाहू, भाजपाला मतं 1,49,13,914 आणि जागा 9, पण काँग्रेसला मतं 96,41,856 आणि जागा 13. शिवसेनेला 73,77,674 मतं आणि 7 जागा, तर राष्ट्रवादी-शरद पवार गटाला 58,51,166 मतं आणि 8 जागा. 2019 च्या लोकसभेचे उदाहरण तर फारच बोलके आहे. काँग्रेसला 87,92,237 मतं होती आणि 1 जागा मिळाली, तर तत्कालीन राष्ट्रवादीला 83,87,363 मतं होती आणि जागा 4 आल्या. पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल! तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल, अशी अपेक्षा आहे.’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button