वाढत्या वीज कोसळण्याच्या घटनेमुळे वीज अटकाव यंत्रणेची मागणी वाढतेय.
मागील काही वर्षात वीज कोसळून जीवित आणि वित्तहानी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चमकणार्या विजांचा कडकडाट काळजाचा थरकाप उडवणारा असतो. या वाढत्या नैसर्गिक संकटामुळे आगामी काळातील संभाव्य धोका टाळण्यासाठी ठिकठिकाणी आधुनिक वीज अटकाव यंत्रणा उभारण्याच्या मागणीला जोर वाढू लागला आहे.
रत्नागिरी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ४९५ तर सिंधुदुर्गात ११८ ठिकाणी वीज अटकाव यंत्रणा कार्यान्वित करण्याचे प्रस्ताव करण्यात आले आहेत.आपत्ती व्यवस्थापन योजनेंतर्गत वीज अटकाव यंत्रणा उभारणे बंधनकारक आहे. आगामी काळातील हानी टाळण्यासाठी राज्य शासनाने गांभीर्याने विचार करून वीज कोसळण्याची पूर्वसूचना देणारी तसेच आधुनिक वीज अटकाव यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणी राज्यात वाढू लागली आहे.www.konkantoday.com