लोटे सीईटीपीतून करंबवणे खाडीत जाणारी सीईटीपी सांडपाणी पाईपलाईन अज्ञाताकडून कापण्याचा प्रयत्न.
लोटे सीईटीपीतून करंबवणे खाडीत जाणारी सांडपाणी पाईपलाईन कोतवली येथील सोनपात्रा नदीजवळ कोकण रेल्वेच्या पुलाजवळ तीक्ष्ण हत्याराने कापण्याचा प्रयत्न झाल्याने लोटे औद्योगिक वसाहतीत खळबळ उडाली आहे. ६३० मि.मी. व्यासाच्या एच.डी.पी.ई. पाईपलाईन अज्ञातांना फोडता आलेली नसली तरी झालेल्या प्रयत्नाने पाईपलाईनला गळती लागून ते पाणी खाडीत गेले. हा प्रकार गांभीर्याने घेत सीईटीपीसह एमआयडीसीने या प्रकरणी लोटे दूरक्षेत्रासह खेड पोलीस स्थानकात तक्रार अर्ज देवून दोषींवर कारवाईची मागणी केली. www.konkantoday.com