रायगड : कुंडलिका नदीत बुडालेल्या चौघांचा मृत्यू!

अलिबाग – मागणाव तालुक्यातील रवाळजे येथे कुंडलिका नदीत बुडालेल्या चौघांचा मृत्यू झाला आहे. चौघांचेही मृतदेह शोधण्यात शोध यश आले आहे. सिद्धेश सोनार, काजल सोनार, सोनी सोनार, सिद्धी पेडेकर अशी चौघा मयतांची नावे आहेत.*शनिवारी संध्याकाळी हे दहा ते बारा जण नदीवर कपडे धुण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यातील एक जण बुडाला. त्याला वाचविण्यासाठी अन्य तीन जण नदीच्या प्रवाहात उतरले ते देखील वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक बचाव पथकांच्या मदतीने शोध व बचाव कार्याची सुरुवात केली.

सिद्धेश सोनार आणि सिद्धी पेडेकर यांचे मृतदेह रात्री सापडले. तर उर्वरीत दोघांचे मृतदेह सकाळी शोधण्यात यश आले. हे सर्वजण नवीमुंबईतील रहिवाशी असून, सुट्टीसाठी आजीच्या गावी आले होते.काही दिवसांपूर्वी महाड तालुक्यातील सव येथे पर्यटनासाठी आलेल्या तीन जणांचा अशाच पद्धतीने बुडून मृत्यू झाला होता. तर पावसाळ्याच्या सुरुवातीला मुंबईतील चार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा खोपोली जवळील धरणात बुडून मृत्यू झाला होता. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button