बँकेने सील केलेली सदनिका फोडून अनधिकृत प्रवेश, गुन्हा दाखल.
जनता सहकारी बँक लि. पुणे शाखा चिपळूण यांनी ताबा घेतलेल्या एका सदनिकेचे कर्जदार व गहाणखतदार यांनी बँकेला कोणतीही कल्पना न देता त्याचे कुलूप तोडून प्रवेश केल्याची घटना २२ नोव्हेंबर रोजी घडली. या प्रकरणी गुरूवारी चौघांवर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सलीम चांद मुलाणी, एक महिला, अल्ताफ चांद मुलाणी, अस्लम चांद मुलाणी (सर्व रा. नाझनीन पार्क, सोसायटी शबनम अपार्टमेंट) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद श्रीरंग मोहन चितणे (६३, बेंदरकरआळी, चिपळूण) यांनी दिली आहे.www.konkantoday.com