न्यास ठरवणार रत्नागिरी जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणांतर्गत (न्यास) चाचणी
जिल्ह्यातील १२३ शाळांमध्ये घेण्यात आली. यामध्ये तिसरी, सहावी, नववीचे मिळून ४५० विद्यार्थी या सर्वेक्षणात सहभागी झाले होते. या चाचणीतून रत्नागिरी जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता ठरविण्यात येणार आहे. यंदा जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता किती राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाच्या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) शाळांना परिपत्रकाद्वारे सूचना दिलेल्या होत्या.
मागील वर्षी तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात येत होते. त्या परीक्षेत रत्नागिरी जिल्हा तिसरी, पाचवीत राज्यात पहिल्या दहा क्रमांकात तर आठवी, दहावीत तळात समाविष्ट होता. यावर्षी इ. ३ री, ६ वी आणि ९ वी तील विद्यार्थ्यांसाठी ही चाचणी घेण्यात आली होती. www.konkantoday.com