
चिपळुणात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर.
चिपळूण शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी शहरातील पागझरी परिसरातील एका बालकावर कुत्र्यांनी हल्ला केला. असे असताना नगर परिषदेला भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी संस्थाच मिळत नसल्याचे दिसून येत आहे. १० लाख रुपये खर्च करून ५०० कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केली जाणार असून त्यांना रेबीज लसही दिली जाणार आहे.गेल्या अनेक वर्षापासून शहरात भटक्या कुत्र्यांसह उनाड गुरे गाढवे यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गुरे व गाढवांमुळ अनेक अपघात होत असून अनेकांना जायबंदी व्हावे लागले आहे. तर भटकी कुत्री अनेकांना चावा घेत आहेत. महिनाभरापूर्वी वडनाका येथील सिद्धी गुरव या बालिकेवर चार कुत्र्यांनी ह्ला केला. त्यात ती जखमी झाली होती. तर दोन दिवसांपूर्वी पागझरी परिसरातील धनुष चव्हाण या बालकालाही कुत्र्याने चावा घेतला आहे. त्यामुळे शहरात भीती निर्माण झाली आहे. www.konkantoday.com