कोकण रेल्वे प्रशासनाने रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, संगमेश्वर आणि राजापूर येथील पोस्ट कार्यालयातील आरक्षण सेवेचे काउंटर बंद केले.
कोकण रेल्वे प्रशासनाने रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, संगमेश्वर आणि राजापूर येथील पोस्ट कार्यालयातील आरक्षण सेवेचे काउंटर गेल्या १५ नोव्हेंबरपासून बंद केले आहेत.त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.कोकण रेल्वेचे उपमुख्य वाणिज्य प्रबंधक आर. डी. घोलप यांनी १ नोव्हेंबर २०२४ रोजी असिस्टंट पोस्ट मास्तर जनरल यांना याबाबत पत्र पाठवले आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर, लांजा आणि राजापूर पोस्ट कार्यालयात रेल्वेची सुरू असलेली पीआरएस सेवा १५ नोव्हेंबरपासून बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कोकण रेल्वे मार्गावर ठिकठिकाणची रेल्वे स्थानके शहरांपासून दूरवर असल्याने प्रवाशांना तेथे जाऊन आरक्षण करणे अडचणीचे ठरत होते. त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाने पोस्ट खात्याच्याकोकण रेल्वे प्रशासनाने पोस्ट खात्याच्या सहकार्याने काही पोस्ट कार्यालयात रेल्वेची पीआरएस सेवा सुरू केली होती.