उद्धव ठाकरेंचा पक्ष हा कोकणातून साफ झाला-आमदार निलेश राणें.
कोकणापासून रत्नागिरीत महायुतीला भरघोस यश मिळालं आहे. उद्धव ठाकरेंची फक्त एकच जागा निवडून आलेली आहे, यावर प्रतिक्रिया देताना आमदार निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत हल्लाबोल केला.उद्धव ठाकरेंवर टीका करत निलेश राणे म्हणाले, “उद्धव ठाकरेंचा पक्ष हा कोकणातून साफ झालेला आहे. त्यांना आता कोकणात स्थान नाही. ज्या पक्षाने कोकणाला 40 वर्ष मूर्ख बनवलं. लोकांनी त्यांना जागा दाखवली, हे मी लोकसभेलाही म्हटलं होतं.
कोकणी माणसाला भावनिक करून जर तुम्ही मतं घेत असाल आणि कोकणी माणसाला आणि त्यांच्या जमिनीला ओसाड ठेवत असाल, तर कधी ना कधी कोकणातील जनता तुमच्यावर वचपा काढणार आणि तो वचपा काढलेला आहे. कोकणातून उद्धव ठाकरेच्या पक्षाला हद्दपार केला आहे”.कोकणातील प्रश्नांबाबत सर्व आढावा मी घेणार आहे. पहिले आमदार म्हणून शपथ घेऊदे. त्यानंतर जे प्रश्न महाराष्ट्राच्या हिताचे आहेत, ते सर्व प्रश्न मी मांडणार आहेत.
विरोधक इव्हीएमबाबत अजूनही प्रश्न उपस्थित करत आहेत. राहुल गांधी मारकडवाडीत येतील, अशी चर्चा आहे. यावर राणे म्हणाले, राहुल गांधी येऊन काय करणार. राहुल गांधी फक्त निगेटिव्ह राजकारण करत आहेत. जगात राहुल गांधी जिथे जिथे जातात, आपल्या देशाची बदनामी करायलाच जातात. हे निगेटिव्ह राजकारण काँग्रेस आणि महाविकास आघाडीसाठी काय नवीन नाही.