आंतरराष्ट्रीय आयोजनात पुणे येथे स्वामी स्वरूपानंद पत संस्थेचं प्रेझेंटेशन भारत सरकारच्या राष्ट्रीय सहकार निगम चे आयोजन
केंद्र सरकार ने अंगीकृत केलेल्या राष्ट्रीय सहकार निगम ने पुणे वैकुंठभाई मेहता इंस्टिट्यूट मध्ये आज आंतरराष्ट्रीय अभ्यास वर्गात समाविष्ट सहकार प्रतिनिधिन समोर स्वामी स्वरूपानंद पत संस्थे ची यशोगाथा मांडण्याची संधी प्राप्त करून दिली.
या उपक्रमात महाराष्ट्रातील विविध प्रकार च्या तीन संस्थांचे प्रेझेंटेशन आज करण्यात आले त्यामध्ये पत संस्था वर्र्गा मध्ये स्वामी स्वरूपानंद पत संस्थेची माहिती ,कार्यपद्धती , संख्याकीय प्रगती, प्राप्त पुरस्कार, इत्यादी बाबत प्रेझेंटेशन करता आले. तीन देशांच्या २५ प्रतिनिधिन समोर स्वरूपानंद पत संस्था मांडता आली आणि या प्रेझेंटेशन साठी स्वरूपानंद ची केलेली निवड ही संस्थे साठी अभिमानाची गोष्ट आहे .कोकणातल्या सहकार क्षेत्रा साठी ही आंतरराष्ट्रीय प्रतिनिधिन समोर कोकणातील सहकारी संस्था मांडली जाते हे प्रेरणा दायी ठरणार आहे.असे पटवर्धन म्हणाले.
NCDC या केंद्रीय संस्थेने केलेल्या या आयोजनात जी संधी दिली त्याबद्दल या राष्ट्रीय संस्थेचे आभार दीपक पटवर्धन यांनी मानले आहेत.