
एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मोबाइल लांबविला
रत्नागिरी शहराजवळील कोकण नगर भागामध्ये एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मोबाइल लांबवल्याची घटना घडली आहे. यातील फिर्यादी सिकंदर शेख हे कोकण नगर भागातील युनियन बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यामध्ये एटीएममध्ये आलेल्या एका माणसाने आपल्याला पैसे काढता येत नाही त्यासाठी मदत करण्याची विनंती सिकंदर याला केली. ही मदत करत असताना चोरट्याने सिकंदराच्या खिशातून मोबाइल चोरून नेला. हा प्रकार लक्षात येईपर्यंत चोरटा मोबाइल घेऊन फरारी झाला होता. यामुळे शेख यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
www.konkantoday.com