
शिपवर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पावणे तीन लाख रुपये उकळले ,दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
आपला पती शिपवर कामाला असून तुम्हालाही तो नोकरीला लावेल यासाठी फिर्यादी मतीन मुजावर नाचणे रोड रत्नागिरी यांचेकडून पावणे तीन लाख रुपये घेऊन प्रत्यक्षात त्याला नोकरी न देता त्यांची फसवणूक केली म्हणून आरोपी राेजिना काझी व अजीम काझी राहणार कसबा संगमेश्वर यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील फिर्यादी मुजावर यांना नोकरीची गरज होती. यावेळी आरोपीने आपला पती शिपवर नोकरीला असून तो तेथे फिर्यादीला कामाला लावू शकतो यासाठी युनियन ऑफ सी फेअर्स ऑफ इंडिया येथे ट्रेनिंग घ्यावे लागेल यासाठी फिर्यादि यांचेकडून दोन टप्प्यात ९०हजार रुपये घेतले त्यानंतर ट्रेनिंगसाठी फॉर्म भरण्यासाठी परत एकदा १लाख रुपये घेतले त्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या डोळ्यात डिफेक्ट असल्याने ट्रेनिंग घेता येणार नाही असे सांगितले तसेच बेलापूर येथे दुसरा कोर्ससाठी पैसे भरतो असे सांगितले परंतु त्या ठिकाणी फिर्यादी कोर्ससाठी गेले असता आरोपीने पैसे भरले नसल्याचे आढळले याबाबत फिर्यादीच्या आईने चौकशी केली असता आरोपींनी आणखी पैसे भरा अशी मागणी केली परंतु फिर्यादी यांनी पैसे भरले नाहीत मात्र फिर्यादीकडून वारंवार पैसे घेऊन प्रत्यक्षात त्याला नोकरी लावली नाही आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी मुजावर यांनी शहर पोलीस स्थानकात आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
www.konkantoday.com